
वडांगळी येथील सतीमाता सामतदादा यात्रेत अंनिसच्या कार्यकर्त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे या आशयाचे निवेदन एमआयडीसी सिन्नर चे पोलिस निरीक्षक भरत जाधव यांना निवेदन देताना सिन्नरचे अंनिसचे पदाधिकारी
सिन्नर (प्रतिनिधी ) वडांगळी येथे रविवार ता.1 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या सतीमाता सामतदादा यात्रेत उघड्यावर पशुबळी देऊ नये, नवसपूर्ती साठी पशुहत्या करणे अयोग्य आहे.देव कधी बकरी मागत नाही,फक्त श्रद्धा असावी लागते, अशा प्रकारचे प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ३०/३५ वर्षांपासून पशुहत्येविरुद्ध लढा देत आहे. या दिवशी प्रबोधन करताना, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पुरेसे संरक्षण मिळावे अशा आशयाचे निवेदन एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरत जाधव यांना महा.अंनिस सिन्नर शाखेच्या वतीने देण्यात आले.यावेळी नाशिक जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके ,सिन्नर शाखेचे नूतन अध्यक्ष राजेंद्र मिठे ,उपाध्यक्ष बापू चतुर,सुनील कुऱ्हे, कार्याध्यक्ष सुकदेव वाघ,प्रधान सचिव दीपक भालेराव उपस्थित होते.
