
रोहिले( प्रतिनिधी ) श्री. संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित एस. जी. राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.,,,,, कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम यांची निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून राहिले ग्राम पंचायतीचे सरपंच सौ. ठकुबाई पवार तसेच उपसरपंच सुनंदाबाई बागुल यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष निवडीस श्री. जे. डी. जाधव सर यांनी अनुमोदन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बाबासाहेब सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी पालक, ग्रामस्थ व गावातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, ध्वज पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. ध्वजारोहण सौ. जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कवायत, विद्यार्थी भाषणे, स्वागत गीत , राष्ट्रगीत, ध्वज गीत, राज्य गीत व असाक्षर शपथ घेण्यात आली. आभार प्रदर्शन श्री प्रशांत पवार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे परिश्रम घेतले व अप्रतिम असा कार्यक्रम घडून आणला.
