
मालेगाव (.प्रतिनिधी ) महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपुर येथे दि: 01/04/ 2025 रोजी मा.प्राचार्य दिनेशजी शिरुडे साहेबांच्या हस्ते ज्ञान समृद्धी वर्गाचे उद्घाटन करण्यात आले तसेच सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना ज्ञान समृद्धी वर्गाच्या निमित्ताने चांगली संधी उपलब्ध झाली असून जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना यश निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त करून या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस आर निकम यांनी केले,तसेच अध्यक्षीय मनोगतातून प्रा. डॉ. दिनेशजी शिरुडे सर यांनी ज्ञान समृद्धी वर्ग सुरू करण्याचे उद्दिष्ट आणि महत्त्व विशद केले,

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वाचा व कलागुणांचा विकास व्हावा तसेच महाविद्यालयातील गुणवंत , अभ्यासू ,विद्यार्थ्यांचे उदाहरण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राम बागुल सर यांनी केले . कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री एस आर निकम शैक्षणिक पर्यवेक्षक श्री ए डी पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
