
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६५ वा दिवस अगदी किशोरावस्थेत शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापनेची शपथ घेतली. साधनसंपत्तीची उणीव, स्वकीयांचा विरोध, मोगलशाही व दक्षिणेतील मुस्लिम शासकांचा विरोध असतांनाही महाराज डगमगले नाहीत. त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्यासोबत स्वराज स्थापनेसाठी स्वतःची आहूती देणारे अठरापगड जातीचे गोरगरीब मावळे कसे गोळा केले, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. शत्रूबद्दलही आदर असणारे महाराज शेतकऱ्यांचे वाली, प्रजा हितरक्षक, धर्मरक्षक असलेल्या शिवाजी महाराजांचे तत्वज्ञान प्रत्येक भारतीयांने जाणून घेऊन ते आत्मसात करणे ही आज काळाची गरज आहे. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर १३ चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ३ एप्रिल २०२५
★ १६८० हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृतीदिन.
★ १७८१ भारतीय धर्मगुरु स्वामी नारायण यांचा जन्मदिन
★ १९१४ भारताचे पहिले फिल्डमार्शल जनरल माणकेशा यांचा जन्मदिन
★ शिवप्रभूंच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
