
सिन्नर प्रतिनिधी:- घोटी येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच अभिनव बाल विकास मंदिर मध्ये प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांनी घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली.राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक ॲड. संदीप भाऊ गुळवे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजपूजन शालेय समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ जाधव व उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष राजेंद्र आप्पा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले .व्यासपीठावर माजी आमदार शिवराम झोले,पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णा पवार, पोलिस निरीक्षक विजय शिंदे,उपनिरीक्षक श्री.भिंगरदे, शालेय समितीचे सदस्य गणपत राव,सागर हांडे,योगेश जाधव,नरेंद्र मेधने,दीपा कंदकुरीवार ,सुनीता सिंघल,स्वातीताई कडू,वैशाली गोसावी,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ गव्हाणे, माता-पालक संघाच्या उपाध्यक्षा सुनिता वाघचौरे,दत्तात्रय भोर,रामदास भोर,केंद्रप्रमुख राजेश खैरनार,प्राचार्य नितीन भामरे, उपमुख्याध्यापक उल्हास पवार , पर्यवेक्षक हिरामण चौधरी ,मुख्यलिपीक भाऊसाहेब रणशेवरे आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवर व पालकांना संविधान प्रतिज्ञा श्रीमती एम.आर.सोनवणे यांनी दिली . गायत्री सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना कॉपीमुक्त अभियान शपथ तसेच असाक्षर मुक्त गाव शपथ / साक्षरतेची शपथ दिली. संगीतशिक्षक प्रकाश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,ध्वजगीत, राज्यगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. क्रीडा शिक्षिका वंदना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर उत्कृष्ट संगीत कवायत सादर केली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी तर आभार अनिता राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.यावेळी शालेय समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, ग्रामस्थ ,संस्थेचे सभासद ,हितचिंतक व देणगीदार उपस्थित होते.
