
नाशिक (प्रतिनिधी ) यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक येथे रंगणार गोदाकाव्योत्सवयशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक आणि निर्मल गोदा गौरव फाउंडेशन,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने गोदा काव्योत्सव हा कार्यक्रम शुक्रवार दि ०४/०४/२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक येथे संपन्न होणार आहे. गोदावरी जलपूजन आणि गोदा प्रार्थना होऊन कार्यक्रम सुरू होणार आहे. ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली कुमार गट (१८ वर्षा आतील )आणि खुला गट या दोन गटात काव्य संमेलन होणार आहे. कवी संमेलनासाठी कवितेला विषयाचे कुठलेही बंधन नाही.तरी काव्य संमेलनात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक ९१५८७७४२४४ , ७८८८१२६५४१
