
मूळडोंगरी ता. नांदगाव (प्रतिनिधी)श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मान.श्री एस.जी. राठोड साहेब सचिव श्री सिद्धांत दादा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बोरसे एस.एस.मॅडम उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ जनाबाई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सदस्य व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.तसेच पुढील कार्यक्रमात विद्यार्थ्यांची संगीतमय कवायत, विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीत, सविधान वाचन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपर वातावरणात संपन्न झाला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागुल मॅडम व आभार प्रदर्शन दराडे सर यांनी केले.
