
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६१ वा दिवस
मी पणाचा अंध, आग्रही भिंतीच्या आत आपण गुदमरून गेलो आहोत. प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या संदर्भात पाहतो. मी हे केले, मी ते केले असे अहंकाराने आणि म्हणतो. या शूद्र मीपणाचा त्याग करा. या दंभाचा त्याग करा. सर्वांन्तःकरणपूर्वक म्हणा, मी नव्हे भगवंता सारे काही तूच आहेस! याची अनुभूती घ्या अहंकारातून आपण निर्माण केलेले जग आपण त्यागले नाही तर स्वर्गाची इच्छा सुद्धा आपल्याला धरता येणार नाही. जे शांत असतात मौनी असतात, त्यांच्या ठाई हे सामर्थ्य असते. ज्यांनी आपली अस्मिता विसर्जित केली आहे, त्यांनाच खरे प्रेम करता येते. मी आणि माझे हे शब्द ते कधीच उच्चारित नाहीत. केवळ साधनरूप होऊन काम करतात त्यांना सुख वाटते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ५ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २५ जानेवारी २०२६
★ नर्मदा जयंती
★ रथसप्तमी
★ जागतिक सुर्यनमस्कार दिन
★ १८६२ सामाजिक कार्यकर्त्यां व महिला सेवा सदनच्या संस्थापिका रमाबाई रानडे यांचा जन्मदिन
★ १९१९ पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना
★ २०११ पासून राजकीय प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी “राष्ट्रीय मतदार दिन.”
★ राष्ट्रीय पर्यटन दिन…
