
नाशिक( प्रतिनिधी) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटनाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत आज शनिवार दि.२४/०१/२०२६ रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम, उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर शाळेच्या पर्यवेक्षिका मा. सौ. गवारे मॅडम गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मा.सौ चंद्रात्रे मॅडम मॅडम, मा.श्री उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.जोशी मॅडम यांनी यांनी केले या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे जिल्हा विधी प्राधिकरण, नाशिक तर्फे सहाय्यक लोकअभिरक्षक नाशिकचे ॲडव्होकेट श्रीमती ए.एम.बिंद्रा यांनी यावेळी मुलींना सुरक्षा विषयक कायदे,NALSA या विषयक माहिती सांगून राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व व अधिकार यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले

शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम यांनी यावेळी बालिका दिनाचे महत्त्व सांगून जिथे आजही स्त्रियांना समान हक्क आणि आदर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.तसेच महिला सक्षमीकरण हा केवळ महिलांचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा प्रश्न आहे.म्हणूनच महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये समानसंधी आणि अधिकार देणे ही काळाची गरज आहे,असे मौलिक मार्गदर्शन केले.

शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर यांनी मनोगतातून बालिका दिनाचे महत्त्व सांगत लेकीचा पाळणा गीत आपल्या सुंदर आवाजात गायिले.तसेच काही विद्यार्थिनींनी कु.कृत्तिका बागुल हिने बालिका दिनाचे विशेष महत्त्व,कु.कृत्तिका येलिसने बालिकेचे माहिती सांगितले.तर कु.तुप्ती बागुल,कु.प्रतिक्षा भोये,कु.प्रगती धात्रक,कु.वैष्णवी निंबाळकर यांनी जिजाऊंच्या लेकी हे सुंदर गीत व गाणे सादर केले.तसेच कु.प्रेरणा पाटील हिने २५ जानेवारी मतदार दिनाचे महत्त्व सांगितले.काही विद्यार्थिनींनी प्रेरणा गीत सादर केले.त्यांना सौ.मिनाक्षी दोंड मॅडम यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे नियोजन सौ.वैशाली जाधव मॅडम यांनी केले.सुत्रसंचालन कु.भूमिका उगवते हिने तर आभारप्रदर्शन सौ.मिनाक्षी दौंड मॅडम यांनी केले.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले.
