
कुंदेवाडी ( प्रतिनिधी )आमची शाळा जिल्हा परिषद कुंदेवाडी येथे दि.२३/१/२०२६ रोजी माता पालक मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. वसंत पंचमी चा दुग्धशर्करा योग जुळून आला.
कार्यक्रमासाठी सौ.कविता बलदोटा,यांना आमंत्रित करण्यात आले होते.यांच्या उपस्थितीत बहुसंख्य माता पालक मोठ्या उत्साहाने उपस्थित झाल्या होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ.वैशाली शिंदे मॅडम यांनी आलेल्या महिलांचे मनःपूर्वक स्वागत केले .कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला. आलेल्या पाहुण्या व माता पालक यांच्या स्वागतासाठी आमच्या चिमुकल्यांनी सुंदर रांगोळी काढून स्वागत केले.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.मंगेशभाऊ भुजबळ व उपाध्यक्ष श्री.विलास काळे हेही कार्यक्रमाला उपस्थित होत
सर्व माता भगिनींना त्यांनी हळदीकुंकू निमित्त शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सुनिता कुशारे,प्रमुख अतिथी सौ.पल्लवी काळे,भाग्यश्री वावधाने,सौ.अनारसे ताई, सौ.कविता बलदोटा बचतगट अध्यक्षा यांच्या हस्ते सरस्वती पूजन केले.तसेच “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुॅंगा !” ही ललकारी देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी आई ही बालकाची प्रथम गुरु असते. आई-वडिलांनी केलेले संस्कार शिक्षकांनी दिलेले शिक्षण व मार्गदर्शन यांचा समन्वय साधून आपल्याला उज्वल व्यक्तिमत्त्व बालकाचे घडत असते. आपण एकमेकांच्या सहकार्याने सुजाण नागरिक घडवायचा आहे.हे प्रतिपादन सौ.वैशाली शिंदे मॅडम यांनी केले.
मुलांचे आरोग्य व आहार, यावरील श्रीमती जयश्री लायरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.उपस्थिती व शाळेतील विविध कार्यक्रमांचे आयोजन व सहशालेय उपक्रमांचे कौतुक केले.
शाळेतील श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी उपस्थित महिलांना मराठी शाळेचे व मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.श्रीमती पूनम महाजन मॅडम यांनी नवागतांच्या प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले. सौ.कविता बलदोटा व उपस्थित भगिनी यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला. अध्यक्ष सौ.कुशारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले काही अडचण असेल तर आम्ही सदोदित सहकार्य करू असे आश्वासन दिले.
सौ.पल्लवी काळे यांनी शालेय गुणवत्तेबाबत विशेष कौतुक केले.
आदरणीय मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे मॅडम यांनी माता-भगिनींना मकर संक्रांतीचे व भारतीय संस्कृतीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी त्यानंतर विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. महिलांनी सुंदर सुंदर असे उखाणे यावेळी सादर केले.उत्तरोत्तर हळदी कुंकू व वाण देण्याचा कार्यक्रम रंगतदार झाला.आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सौभाग्याचं लेणे म्हणून एक वाण व तिळगूळ समारंभ असा वैविध्यपूर्ण हळदी कुंकवाचा उत्स्फूर्त कार्यक्रम काल आमच्या शाळेत साजरा झाला.
मकरसंक्रांत कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार सौ.पाटील मॅडम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका भगिनी यांचे सहकार्य लाभले.
