
श्री निवृत्ती सहादु गवळी, मूळ राहणार देवपूर सध्या नाशिक गोविंद नगर व तिडके कॉलनी.नाशिक, आपल्या अखिल सगरवंशीय पंढरपूर माळी समाजाचे ट्रस्टचे सचिव यांचे श्री निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा या दिनी 86 व्या वर्षात,पदार्पण होत आहे. त्यानिमित्त श्री निवृत्ती मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
.. निवृत्ती मामा हे पूर्वापार देवपूर, तालुका सिन्नर येथील रहिवासी आहेत.
त्यांचे आजोबा /पणजोबा हे मूळ ओतूरचे ,कालांतराने ते देवपूर( सिन्नर) येथे आल्यानंतर त्यांना गवळी नाव पडले ,मुळात त्यांचे वंशज हे आंबेकर /मोरे म्हणजेच देशमुख असावेत. त्यांचे वडील सहादू ठकुजी गवळी हे नाशिक चे पांडुरंग बांडे यांचे भाचे होते व बाडे परिवाराच्या पूर्वी देवपूर येथे मोठ्या जमिनी होत्या त्यामुळे सदर कुटुंब हे देवपुर ला स्थायिक झाले. निवृत्ती मामाची आई सोनू बाई या ताहाराबाद येथील मालजी साळवे पाटील यांच्या कन्या (गजानन साळवे यांच्या आजोबांची बहीन) .. निवृत्ती मामांचा जन्म दिनांक 24 जानेवारी 1941 म्हणजेच मराठी तिथी प्रमाणे निवृत्तीनाथांच्या यात्रेच्या/ भागवत एकादशी च्या दिवशी झाल्याने, मामाचे नाव निवृत्ती असे ठेवण्यात आले ,मामांचे दोन भाऊ यशवंत गवळी (गुरुजी)राहणार वावी, शेवटचा भाऊ ज्ञानेश्वर/गणेश गवळी ( गणेश हे pwd मध्ये तात्या म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.) राहणार सिन्नर तसेच बहिण श्रीमती रखमा भाऊशेठ पाचोरे,(माजी सरपंच भाटवाडी व सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाल कल्याण विकास नाशिक) तसेच बहिण कै. सीताबाई उर्फ इंदुबाई हरिभाऊ लोणारे राहणार हुसेन बाबा नगर सिन्नर, बहिण सौ सुमन रामनाथ गवळी म्हणजेच (आमच्या सासुबाई व मामी) असे शिक्षित बहिण भावंड आहेत.
1960 मध्ये मामा, सोसायटी सेक्रेटरी म्हणून नोकरीस लागले .त्यांनी सिन्नर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कर्तव्य बजावले आहे.
त्यानंतर ते 1964 मध्ये तलाठी झाले, दिंडोरी तालुक्यात त्यांनी तलाठी म्हणून काम पाहिले, 1965 दरम्यान त्यांना शासकीय नियमाप्रमाणे तलाठी ते ग्रामसेवक असे विभाजन झाल्याने त्यांनी दिंडोरी व सिन्नर नाशिक तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक व त्यानंतर ग्रामविकास अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे.
सन 1998 मध्ये ,मामांना शासन वतीने,आदर्श ग्राम विकास अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मामा जानेवारी 2000 मध्ये सेवानिवृत्त झाले.. तत्पूर्वी मामा हे सेवेमध्ये असतानाच सन 1994 मध्ये पंढरपूर या ठिकाणी समाजाची जागा खरेदी करतेवेळी पंढरपूरला गेले असताना तेथे त्यांच्या तलाठी व ग्रामसेवकाच्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांच्यावर, तत्कालीन समाजातील प्रतिष्ठान नी विश्वस्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली… श्री निवृत्ती मामांनी,आजपर्यंत अत्यंत मेहनतीने प्रामाणिक व सचोटीपणाने संस्थेचे पूर्णवेळ सचिव म्हणून काम केले आहे ,
निवृत्ती मामा हे सर्व विश्वस्तांशी संपर्कात राहून, वेळोवेळी बँकेत जाणे, ऑडिटर कडे जाणे, सभा बोलावणे, देणगीदारांना माहिती देणे, वेळोवळी संस्थेच्या रेकॉर्डचे कागदपत्र शासकीय यंत्रणेला झेरॉक्स करून सादर करणे इत्यादी कामे,संस्थेचा शिपाई नसताना देखील 86 व्या वर्षी स्वतः करत असतात.
मामा हे समाजातील बांधव किंवा अन्य व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांची वर्गणी जमा करण्यासाठी माहिती देण्यासाठी स्वतःचे गाडीने आजही वयाच्या 86 वर्षापर्यंत पायी व स्वतः मोफेड स्कूटर वर फिरताना दिसतात, तथापि सुरवातीच्या काळात समाजातील थोरामोठ्यांनी , दिवंगत नेत्यांनी, विश्वस्त व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या ग्रुपमधील बहुतांशी सभासदांनी (प्रत्येकाचा नामोल्लेख शक्य नाही) पंढरपूर येथे मनपा कार्यालयात तहसीलदार कार्यालय तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयात जाणे येणे करता पदर खर्चाने वाहने आणली-नेली आहे. जागा खरेदीचे वेळी सुद्धा, सिन्नर पंचक्रोशीतील, व खानदेश परिसरातील समाजातील मान्यवर व दिवंगत व्यक्तींचे देखील मोठे योगदान होते .. प्रत्येकाने आपापल्या परीने योग्य ती मदत केली आहे, त्यातून आपली भक्त निवासाची शेतजमीन ही दहा गुंठे एवढ्या मोठ्या आकारमानाची बिगर शेती आहे. तिच्यावर आता कायदेशीर पंढरपूर नगर परिषदेचा मंजूर प्लॅन आहे. आपली भक्त निवासाची इमारत ही पंढरपूर यात्रा बस स्थानकाच्या समोर असून इमारतीचे पाठीमागे 500/ 600 मीटरवर चंद्रभागा नदी असल्याने .. इमारतीचा पाया हा खोलवर फुटिंग व फायलिंग घेऊन करण्यात आला आहे ..जिवंत असेपर्यंत हे काम पूर्णत्वास जावे ही मामाची कायमच तळमळ असते.. मध्यंतरी कोरोना महामारीमुळे भक्तनिवासाचे काम लांबणीवर पडत होते त्यामुळे लोकांचे पैसे जमा केले परंतु काम पूर्ण होत नाही ह्या भावनेतून मामा अस्वस्थ राहत होते.मामांनी, भरपूर वेळा सेवा निवृत्ती घेण्याचा प्रस्ताव विश्वस्तां समोर मांडला; परंतु विश्वस्तांनी जोपर्यंत तुम्ही चालत फिरत आहात तोपर्यंत काम करतच राहायचे असा आग्रही सल्ला केल्याने मामा आजही सेक्रेटरी पदावर आहे.मामा हे उमेदीने काम करीत असतात.. मामाची समाजाप्रती तळमळ व संस्थेविषयी असलेली सदभावना ही वाखणण्याजोगी आहे. मामाचे मुले, मुली, नातू हे सर्व वेल सेटल असल्याने मामांना कुटुंबाकडे लक्ष द्यायची आवश्यकता पडत नाही. उलट अर्थी मामाचे कुटुंबीय हे मामाच्या आरोग्याची काळजी घेतात व मामांनी घेतलेल्या सामाजिक ध्यासा मध्ये वाहून घेतात .. त्याचे या कार्यात , त्यांची पत्नी सौ विमलमामी ,मुले सुनील(आर्ट टीचर) अनिल व मामांच्या स्नुषा अनुक्रमे रेखा व सारिका तसेच नातू ललित व अभिषेक तसेच नात सून पूर्वा , कन्या सौ प्रतिभा राजेंद्र महाजन, नात डॉक्टर ऋतुजा महाजन (सुरडकर) देखील मामाना पाठिंबा देतात व मदत करतात …श्री निवृत्ती मामा व मामाच्या कुटुंबांना भावी आयुष्य दीर्घ, सुख-समृद्धीचे , उदंड व निरोगी जावो व त्यांचे कुटुंबाचे हातून हे सामाजिक कार्य असेच घडत राहो,… ‼️अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो..🙏 विजय लोंढे , समस्त समाज बांधव व पंढरपूर भक्तनिवास विश्वस्त न्यास..वतीने.
संग्रहित – गजानन साळवे
शुभेच्छूक महामित्र परिवार
🙏🙏💐💐🎂🎂
