
मुळडोंगरी (प्रतिनिधी ) दिनांक 23 जानेवारी 2026,
विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा शिस्त आणि स्वयंअभ्यासाची सवय निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेत कॉफी मुक्त अभियान अंतर्गत, शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्वशिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापकांनी
कॉपीमुक्त परीक्षांचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर परीक्षा द्याव्यात
असे आव्हान केले.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी कॉपी न करता परीक्षा देण्याची, इतरांना कॉफी न करण्यास प्रवृत्त करण्याची तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची शपथ देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी शपथ मोठ्या उत्साहाने व जबाबदारीने घेतली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कॉफी मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुलांची जाणीव वाढवून परीक्षांकडे सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण होईल. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
