
मनमाड ( प्रतिनिधी). निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश जन्म उत्सव निमित्ताने 251 किलो बुंदीच्या लाडूचा महाप्रसाद गणेश भक्तांची अलोट गर्दी मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी गुरुवार दिनांक 22जानेवारी 2026 रोजी श्री गणेश जयंती ➖️निमित्ताने आम्ही परंपरा पाळतो आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणाऱ्या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे भरगच्च धार्मिक कार्यक्रमां चे आयोजन करण्यात आले होते

.मंदिराला आकर्षक सभा मंडप, रोषणाई करण्यात आली होती तसेच श्री निलमणी गणेश च्या मूर्ती असलेल्या गाभाऱ्यात अतिशय सुंदर अशी फुले, पान, मोसंबी सफरचंद व इतर फळांची सजावट करण्यात आली होती यात मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शन मध्ये सकाळी 06 -00 वाजता श्री निलमणी गणेशास महाभिषेक पूजा करण्यात आली तर सकाळी 09-00 वाजता श्री सत्यविनायक महापूजा संपन्न झाली आणि रात्री ठी 08-00 वाजता श्री निलमणी ची महाआरती करण्यात आली महाअभिषेक व महाआरती वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात आले या श्री गणेश जन्म उत्सव निमित्ताने श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्ट तर्फे संपूर्ण दिवस भर 251 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद वाटप करण्यात आले

मनमाड शहर व परिसरातील गणेश भक्तांनी नवस फेडण्यासाठी व दर्शना साठी तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमाना अलोट गर्दी केली होती श्री गणेश जयंती उत्सवा च्या कार्यक्रमाचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळाने केले
