
सिन्नर (प्रतिनिधी ) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की २३ जानेवारी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांची स्मृतिदिन व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शहाजीराजे भोसले हे पराक्रम, बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण त्याचे खरे संकल्पक शहाजी राजे भोसले होते शहाजीराज्यांनी आदिलशाही तसेच निजामाकडे सुभेदार म्हणून मोठे पराक्रम केले. त्यांनी पुण्यासारख्या भागात मराठी जनतेला आपला पराक्रम तर दाखवला होताच पण त्याचबरोबर कर्नाटकातदेखील त्यांनी आपले कर्तृत्व गाजवले होते. आज शहाजी महाराजांची आजच्याच दिवशी २३ जानेवारी १९६४ मध्ये महाराज शिकारीसाठी बाहेर पडले असताना त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला आणि घोडा कोसळला. या अपघातात महाराजांचा मृत्यू झाला.तसेच भारत स्वतंत्र्यासाठी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.नेताजींनी भारताची शक्ती, आकांक्षा, प्रेरणा आणि निःस्वार्थपणे राष्ट्रसेवा करण्याच्या अदम्य भावनेचे प्रतीक आत्मनिर्भर भारत मोहीम एक चळवळ बनली अशा महान क्रांतिकारकास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी आपले हक्क अधिकारासाठी सर्व जाती-धर्माचे लोकांना न्याय देण्याचे काम केले दिवंगत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश माळी यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार मनोज माळी यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सह संस्थापक विजय मुठे प्रकाश माळी मनोज माळी आर टी जाधव संतोष सोनवणे विजय जाधव राजेंद्र देशमुख पांडुरंग चकोर नामदेव कुटे प्रकाश देशमुख शिवाजी कांबळे चंद्रकांत झगडे गोपी शिंदे धनंजय परदेशी सोमनाथ लोहारकर गणपत काळे राजेंद्र सातपुते गोपीनाथ वाजे संजय पोटे सुभाष परदेशी राजेंद्र सातपुते आदि उपस्थित होते
