
नाशिक ( प्रतिनिधी ) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातील मोहिनी देवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिर व बालमंदिर या शाळेत महिला सप्तशक्ती मेळावा संगम कार्यक्रम यशस्वी महिलांचा सत्कार करून संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सौ कविता गाडेकर प्रमुख पाहुण्या, सौ नलिनी कड सायकल लीस्ट व प्रमुख वक्त्या डॉक्टर प्राची सराफ बेलन मारवाडी मंच अध्यक्ष सौ अमृता भुतडा व त्यांचे पदाधिकारी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सौ सारिका शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता चौधरी व बालमंदिर अधीक्षिका सौ जयश्री देशमुख या उपस्थित होत्या

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वंदने नी झाली ह्या कार्यक्रमात इयत्ता तिसरी चौथीच्या मुलींनी नारी शक्तीचा गौरव हे समूहगीत सादर केले एकत्र कुटुंब पद्धत जपणाऱ्या आदर्श माता सौ संध्या कोंगे व आधार आश्रमातील मुलांना सांभाळणाऱ्या ताई व एकत्र कुटुंबात राहणाऱ्या प्रमुख व्यक्ती सौ माया भारती यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला थोर महिलांच्या वेशभूषेत माता पालक उपस्थित होत्या इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी कर्तुत्ववान महिलांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली याकार्यक्रमात हळदी कुंकू औचित्य साधून महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली

सौ जयश्री देशमुख यांनी पालकांना प्रश्न विचारून त्यांना शाबासकीची थाप म्हणून मातृभाषेतून शिक्षण हे पुस्तक भेट म्हणून दिले डॉक्टर प्राची सराफ यांनी पालकांना कुटुंबाविषयी प्रबोधन केले मुलांना मोबाईल पासून दूर राहण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले सौ नलिनी कड यांनी योगाचे महत्त्व सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कविता गाडेकर यांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मालिनी सूर्यवंशी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता चौधरी पाहुण्यांचा परिचय स्वागत श्रीमती जयश्री बहिरम कार्यक्रमाचे आभार शीतल कोरडे यांनी मानले

कार्यक्रमाची सांगता प्रतिज्ञाने झाली व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले
