
लासलगाव, ता. २३ (प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि उच्च माध्यमिक विभागाचे सर्व प्राध्यापकांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि स्वयंसेवक विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
