
ओझर: दि.23 (वार्ताहर) येथील बोरस्ते विद्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती व राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. विद्यार्थिनी श्रेया कदम, सर्वस्वी चौधरी, लिखित बडगुजर या विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संगीता सोनवणे यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी सुभाषचंद्र बोस यांचे विचार व मतदानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थी मतदान रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे फलक लेखन कलाशिक्षिका सविता पवार मोहन क्षिरसागर यांनी केले. व सूत्रसंचालन कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी केले. आभार संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी मानले.
