
ओझर: दि. 23 (वार्ताहर) मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उपक्रमांतर्गत येथील बोरस्ते विद्यालयात विद्यार्थ्यानी ‘मले बाजारले जायचं बाई’ नाटिका सादर केली. या नाटिकेत प्रमुख भूमिकेत इ. सहावीचे ईश्वरी मोरे अमृता लोखंडे तेजस गायकवाड गौरव मोरे सार्थक आहेर सत्यम मंडलिक शिवा मंडलिक हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या नाटिकेतून प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यात आला. ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत सरोज खालकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ‘मराठी भाषेचे महत्त्व’ ही उत्कृष्ट नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. या नाटिकेत इ. सातवीचे विद्यार्थी श्रेया कदम वैष्णवी पाटील सर्वस्वी चौधरी सहभागी होते. संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे हे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कला शिक्षिका मोनाली निकम यांनी केले.
