
नांदगाव (प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव, नाशिक येथे दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन. यू. पाटील होते याप्रसंगी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना सामाजिक शास्त्र हा समाजाचा आरसा दाखवणारा घटक आहे. सामाजिक समस्यांचा उलघडा करणे आणि उत्तम नागरिक निर्माण होण्याकरिता सामाजिक विषयांचे अध्ययन होणे अत्यंत आवश्यक आहे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केली . उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. डी. एन. कारे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरजकुमार प्रसाद यांनी केले. त्यांनी सामाजिक शास्त्राचे महत्त्व, समाजाच्या विकासातील त्याची भूमिका व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आणि मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ सी.बी निगळे सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिले. आणि सामाजिक शास्त्र अंतर्गत येणाऱ्या विषयाची माहिती दिली . विशेष अतिथी उपप्राचार्य डॉ.एस. ए. मराठे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी डॉ. दीपक कारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सामाजिक शास्त्र
म्हणजे मानवी वर्तन, समाज आणि संस्कृतीचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र आहे, ज्यात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र यांसारख्या विविध शाखांचा समावेश होतो, जेणेकरून समाज कसा कार्य करतो, लोकांमध्ये संबंध कसे असतात आणि सामाजिक बदल का घडतात हे समजावून सांगता येते. हे शास्त्र आपल्याला समाजाच्या रचना, गट, संस्था आणि मानवी परस्परसंवादाबद्दल सखोल माहिती देते, ज्यामुळे सरकार, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी मदत होते. सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक जाणीवा विकसित करण्यासाठी सामाजिक शास्त्रांचे योगदान स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी संशोधन, सर्वेक्षण, व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, कौशल्य उपक्रम त्याचबरोबर डिजिटल लिटरशी, शेअर मार्केट यांचे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादन करावे व सामाजिक उन्नती निर्माण करण्यासाठी हातभार लागेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. लोकशाही बळकट करणे, कुशल नेतृत्व निर्माण करावे,असे आव्हान त्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्याकरिता डॉ. राजेश डी.
झनकर, प्रा एम. बी. आटोळे डॉ. बी.एम.अहिरे प्रा.भीमराज गायकवाड,प्रा. डी. वाय तुंगार, प्रा. संदीप दौड,प्रा, योगेश वाघ प्रा. राठोड प्रा. शिंदे प्रा. ए. बी. जाधव,डॉ. डी डी ठाकरे, डॉ.श्रीमती धोंगडे , प्रा श्रीमती आवारे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. पी. टी. निकम यांनी केले. यावेळी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते
