
लोहोणेर-( प्रतिनिधी):येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षरा रमेश देसले हिने भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय भूगोल दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत १००पैकी ८४ गुण मिळवून यश संपादित केले.विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक संकल्पना त्याचे रहस्य आणि उकल याविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी त्याचबरोबर या भौगोलिक संकल्पना सहज व सोप्या पद्धतीने समजाव्यात या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन या संस्थेच्या वतीने करण्यात येते. मुख्याध्यापिका कल्पना शिंदे,उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे, पर्यवेक्षक विलास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात आले.सदर परीक्षेत एकूण ५२विद्यार्थी प्रविष्ठ होते.त्यात एकूण ४० विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. अक्षरा रमेश देसले हिला सिल्वर मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षेचे आयोजन भूगोल विषय समितीच्या वतीने करण्यात आले तर परीक्षेचे समन्वयक म्हणून अविनाश मोरे यांनी काम पाहिले. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक छोटू वाघ,राकेश थोरात,मुरली भामरे,मयूर सोनवणे,दशरथ आहेर,मनिषा गिरासे आदींचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,नितीन आहेर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे,पालक संघ उपाध्यक्ष दिपक देशमुख तसेच शालेय समिती,व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ,माता-पालक संघ सदस्य आदींसह आणि शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.
