
साकोरे :(प्रतिनिधी) स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पेडकाई माता माध्यमिक विद्यालय, साकोरे येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि प्रेरणादायी विचारांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत होऊन आदर्श नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित झाले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
