
लोहोणेर जनता विद्यालयाला लांडगेबेट येथील रहिवासी रामदास शंकर बागुल व समाधान मोठाभाऊ बागुल यांच्या वतीने आईच्या स्मरणार्थ दिलेल्या ११,१०० रुपये देणगीचा स्वीकार करताना शिक्षक राकेश थोरात आणि सुनिल एखंडे.
लोहोणेर-:(. प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाला लांडगेबेट (ता. सटाणा) येथील रहिवासी रामदास शंकर बागुल यांनी आपली आई कै.सखुबाई शंकर बागुल यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक कामासाठी ११,१०० रुपयांची देणगी विद्यालयाला दिली. ही देणगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार असून गरजू विद्यार्थ्यांना मदत, शाळेतील शैक्षणिक साहित्य तसेच अध्ययन-अध्यापनासाठी आवश्यक साधने उपलब्ध करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे शाळा मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी सांगितले.सदर देणगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांच्या वतीने शिक्षक राकेश थोरात व सुनिल एखंडे यांनी श्री. रामदास शंकर बागुल व श्री. समाधान मोठाभाऊ बागुल यांच्या हस्ते स्वीकारली.आईच्या स्मरणार्थ शिक्षणासाठी केलेली मदत ही समाजोपयोगी आणि प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशा देणग्या आधार ठरतात असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.यापुढील काळातही शाळेच्या उपक्रमांना सहकार्य करणार असल्याची भावना दात्यांनी व्यक्त केली. तसेच समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही शाळेच्या शैक्षणिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या देणगीबद्दल बागुल कुटुंबाचे मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार तसेच विद्यालयाच्या वतीने उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे सर, पर्यवेक्षक विलास निकम सर यांनी आभार व्यक्त करून ऋण व्यक्त केले.
