
नांदगाव – ,(.प्रतिनिधी ) ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित आश्रम शाळा सरताळे येथे आज शालेय वर्धापण दिन प्रित्यर्थ कला, शास्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक,साहित्यिक प्रा. सुरेश नारायणे यांच्या हस्ते उदघाटन झाले सदर प्रसंगी प्राध्यापक नारायणे यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे महत्व सांगत शालेय स्पर्धा ह्या आपल्यातील उत्तमत्वाच्या विकासार्थ प्रोत्साहित करतात असे नमुद केले

तर प्रमुख उपस्थिती म्हणुन संस्था सरचिटणीस रमेश अप्पासाहेब पगार, संस्था अध्यक्ष श्री दर्शन दादा पगार, कोशाध्यक्षा तथा प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता शेवाळे मॅडम, प्राचार्य समाधान चौधरी, शिक्षण शास्र महाविद्यालय प्राचार्य घुगे सर उपस्थितीत होते. सदर प्रसंगी रमेश अप्पासाहेब पगार यांनी संघर्ष हा यशस्वी जीवनाची वाटचाल ठरवतो म्हणुन विद्यार्थ्यांनी संघर्ष करायला शिकलं पाहिजे आणि शिक्षणाचा लाभ घेत आपलं आयुष्य उज्वल केलं पाहिजे असे नमुद केले.आश्रम शाळा शिक्षक भगवान हिरे यांनी संस्था वाटचाली बद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं

. आभार प्रदर्शनानं कार्यक्रम सांगता करण्यात आली. कार्यक्रम प्रास्ताविक प्राचार्य समाधान चौधरी यांनी मांडले तर सुत्रसंचालण अशोक पाटील सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केलेत.

