
ढेकू.(खु). महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखा कला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा -२०२५ मध्ये माध्यमिक आश्रम शाळा ढेकू च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे एलिमेंट्री परीक्षेत ९ विद्यार्थी तर इंटरमिजिएट परीक्षेत १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय श्रेणीत यश मिळवले आहे .सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक सरचिटणीस श्री कृष्णराव नेरे अध्यक्ष श्री योगेशजी हिरे यांनी कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे .एम .थोरात व कलाशिक्षक श्री .आर .जी. धाकतोडे तसेच अधीक्षक श्री नितीन नितान कर ,श्री.देवरे बी.के., श्री.कामडी एस .एम.,श्री.चव्हाण आर.बी. या सर्व शिक्षकांची मोलाचे मार्गदर्शन लाभले.
