
अंदरसुल (.प्रतिनिधी ) अंदरसूल येथील एम.एस.जी.एस.शैक्षणिक संकुलात सावित्रीमाई फुले तसेच सहकार व शिक्षण महर्षी श्री गोविंदराव नाना सोनवणे यांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .यात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.यात मुलामुलींनी उत्साहाने सहभाग घेतला .यात त्यांनी शिक्षण महर्षी गोविंदराव नाना यांचे शैक्षणिक कार्य,नानांचा जीवनपट,सावीत्रीमाई यांचे शैक्षणिक योगदान, ज्ञानज्योती सावित्री या विषयावर आपली मते मांडली.तसेच इयत्ता ५वी च्या मुलांनी सावित्रीबाई याचे कार्य नाट्याद्वारे प्रस्तुत केले.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन सोनवणे यांनी आज मुलानी आभ्यासाबरोबरच खेळ,साहित्य यांत प्रगती करावी व आधुनिक सुविधांचा उपयोग आपल्या उन्नतीसाठी करावा असे सांगितले.याप्रसंगी एम.एस.जी.एस. सीनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सुवर्णा म्हस्के माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी उपस्थित होत्या.
तसेच संतोष जाधव, महेश मेहत्रे,सोहम मेहेत्रे,सचिन बोढरे, संदीप बोढरे, सुनील सपकाळ, विजय भाटे, गोकुळ वाणी,मयूर भागवत,वरद मिसाळ, मयूर खैरनार,गणेश अमोदकर,दिपाली सोनवणे,सुषमा सोनवणे, सोनाली पाटोळे,आरती भागवत, सुजाता भागवत,माधुरी निकम,कोमल जमधडे,प्रतीक्षा साताळकर,स्नेहल थोरात, अश्विनी मेहेत्रे, निर्मला शिकारे, श्रेया कोटमे, वैशाली शिंदे, सुप्रिया कुळधर, सपना खैरनार, वैष्णवी माळी, प्रतीक्षा वाकचौरे, प्रतीक्षा कोटमे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
