
अंदरसुल.(प्रतिनीधी) येथील एम.एस.जी.एस. माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनुसरून मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवला-अंदरसुल येथील प्रसिद्ध पतंगाचे खेळ हे महाराष्ट्रभर प्रचलित आहेत, यासाठी पूर्वी मांजा लोक स्वतः घरी तयार करत परंतु सध्या नायलॉन मांजाचा कहर पाहायला मिळतो. नायलॉन मांजाचा वापरामुळे मनुष्याबरोबरच पशु- पक्षी यांनाही हानी होताना दिसते. जीव घेण्या जखमा होतात प्रसंगी जीवही जातो. विद्यार्थ्यांना या जीवघेण्या नायलॉन वापरापासून परावृत्त करण्यासाठी एम. एस. जी. एस. विद्यालयाने सतत नायलॉन मांजाविरुद्ध विविध उपक्रम राबवलेले आहेत. याही वर्षी नायलॉन मांजाचा वापर थांबविण्याच्या पार्श्वभूमीवर संकुलातील विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.तसेच स्वतः नायलॉन मांजा न वापरणे व इतरांनाही त्यापासून परावृत्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्याचबरोबर नवीन वर्ष WELCOME 2K26 मानवी साखळीद्वारे साकारून नववर्षाचे स्वागत केले.

याप्रसंगी प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, संतोष जाधव,महेश मेहेत्रे, सोहम मेहेत्रे, अश्विनी मेहेत्रे, दिपाली सोनवणे, सुषमा सोनवणे, सोनाली पाटोळे,आरती भागवत, सुजाता भागवत, कोमल जमदाडे, प्रतीक्षा साताळकर, स्नेहल थोरात, माधुरी निकम, शिवप्रसाद शिरसाट, सुनील सपकाळ, गोकुळ वाणी, संदीप बोढरे सचिन बोढरे, विजय भाटे मयूर भागवत, सुप्रिया कुळधर,निर्मला शिकारे, वैशाली शिंदे, श्रेया कोटमे, सपना खैरनार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
