
अंदरसूल (प्रकाश साबरे) येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र अंदरसुल येथे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पाच दिवसीय पालखी सोहळा दर्शनास अंदरसुल व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दर्शन, किर्तन व महाप्रसादा लाभ घेतला.पाच दिवस चाललेल्या या पालखी सोहळा दर्शन कार्यक्रमा दरम्यान दैनंदिन दर्शन सोहळा, तसेच सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी संत बाळूमामा यांची पालखी क्रमांक २ मध्ये समावेश असलेल्या सुमारे अडीच हजार मेंढ्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.दि.२० रोजी समाज प्रबोधनकार ह.भ.प. वैष्णवी महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीने संत बाळूमामा यांचे जीवनकार्य व त्यांचे उपदेश किर्तनाद्वारे उपस्थित भाविकां समोर मांडले. किर्तन व महाप्रसादाने पालखी सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली याप्रसंगी महिला,अबाल वृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
