
ढेकू ( प्रतिनिधी) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे बोलठाण शाखेतील बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना दहा पंखे भेट म्हणून देण्यात आले
सर्वप्रथम त्यांचे शाळेच्या वतीने शाळेचे अधीक्षक श्री नितीन एकनाथ नितानकर यांनी सर्व बँकेतील अधिकारी वर्गांचे शब्द सुमनांनी स्वागत केले त्यानंतर बँकेचे शाखा अधिकारी श्री शशिकांत संभाजी बरबडे यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री जे एम थोरात यांनी शाल व श्रीफळ देऊन केले तसेच बँकेचे प्रशासन अधिकारी श्री हेमंत सुरेश रावळे यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री डी आर सूर्यवंशी यांनी केले शाळेच्या वतीने सर्व शाखा सर्व शाखेतील कर्मचारी रुंद यांचे आभार करण्यात आले तर आश्रम शाळेच्या वतीने श्री नितानकर आभार मानण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते

