
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक जिल्हा मराठी भाषा समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आणि नाशिक कवीच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त भव्य काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. नाशिक कवी संस्थेला या अयोजनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनात हे कवी संमेलन होणार आहे. संमेलनात कविता सादर करण्यासाठी विषयाचे बंधन नाही मात्र कवीला यासाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असा आशय असलेली कविता सादर करता येणार नाही.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी नाशिक कवीचे अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर हे असतील. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, तहसीलदार प्रदीप कर्पे हे उपस्थित राहणार आहेत.
या काव्य संमेलनाला नाशिकमधील सर्व कवींनी वेळेवर उपस्थित राहून आपली कविता सादर करावी. ४. ३० वाजेनंतर आलेल्या कवींनी कविता सादर करण्याचा कृपया आग्रह धरू नये, त्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही विनंती.
असे आवाहन नाशिक जिल्हा मराठी भाषा समिती आणि नाशिक कवीच्यावतीने नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे आणि सर्व सदस्य यांनी केले आहे.
