
शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांच्याकडून आज नाशिक उपसंचालक कार्यालय येथे शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रलंबित प्रश्नांचा पाढा शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य अध्यक्ष आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या समोर वाचला.
शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना सर्वांचे समक्ष वाचा फोडली.. गेल्या चार महिन्यापासून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी ची उत्तरे दिली व नियमित कामे करण्यासाठी वेळ देण्याऐवजी इतर कामांसाठी चाललो सांगून कामे प्रलंबित ठेवली आहेत ,ही कामे लवकर पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही कार्यालयाला टाळा ठोकू असा इशारा यावेळी दिला.

कोणतीही फाईल कशा पद्धतीने, किती वेळात पूर्ण होईल हे नाशिक शिक्षण विभागात निश्चित सिस्टीम नाही. शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ (Right to Public Services Act चा भाग) अंतर्गत लागू आहे. या अधिनियमाच्या कलम ८(१) आणि ८(२) नुसार प्रत्येक शासकीय विभाग आणि कार्यालयाला नागरिकांची सनद तयार करून तिचे पालन करणे अनिवार्य आहे असे असतानाही ते होतांना दिसत नाही.
# ४ हजारपेक्षा जास्त शिक्षकांना शालार्थचे पत्र दिलेले असून एकही ड्राफ्ट टाकला गेला नाही.
११ वी तुकडीच्या प्रथम मान्यता,
अंतिम मान्यतेच्या अशा अनेक विषयांपैकी एकही प्रस्ताव निकाली काढला नाही.
म्हणजे उपसंचालक यांनी एकही काम मार्गी लावले नाही.

तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी अनेक महिन्यांपासून नवनियुक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या मान्यता दिलेल्या नाहीत.
विनाअनुदानित वरून अनुदानीत फाईल १-२ वर्षोपासून धूळखात पडल्या त्याबाबत काहीच कार्यवाही केलेली नाही.
प्रभारी मुख्याध्यापक अधिकार पत्र वेळेवर देत नसल्याने अनेक शिक्षकांचे वेतन २-३ महिने वेतन निघत नाही.
कार्यालयातील लिपिक ऑफिसमध्ये कामानिम्मित येणाऱ्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी उर्मटपणे बोलतात, वागतात जे दुर्दैवी आहे.
माननीय शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी अधिकाऱ्यांच्या असलेल्या सर्व प्रलंबित फाइल्स या मुदतीत पूर्ण झाल्या पाहिजे..
अन्यथा येत्या अधिवेशनामध्ये अधिकाऱ्यांची लक्षवेधी लावली जाईल असा इशारा दिला.
शिक्षकांच्या वेतनाचा व विविध प्रकारच्या फाईलचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे तो त्वरित मार्गी लावण्याचा सूचना देण्यात आल्या.
या शिक्षक सभेसाठी जळगाव धुळे नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील शेकडो पीडित शिक्षक शिक्षकेतर व सर्व संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये
शिक्षक सेनेचे समन्वयक संभाजी पाटील जिल्हाध्यक्ष मधुकर वाघ उपाध्यक्ष निलेश गांगुर्डे कलीम अंसारी, योगेश्वर मोजाड ,हेमंत पाटील, प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र सोमवंशी विनोद पानसरे, प्रताप सिंग गिरासे, असिफ शेख, साहेबराव ठोंबरे चेतन गोरे, गणेश जाधव राजेंद्र सोमवंशी ,राजेंद्र जगताप. शिक्षक परिषदेचे विजय बडे , माध्यमिक शिक्षक संघाचे मोहन चकोर. शिक्षक भरतीचे जयंत भाबड शिक्षकेतर संघटनेचे सोमनाथ धात्रक मुख्याध्यापक संघटनेचे गोरख कुनगर, त्रंबक मार्कंड, प्रदीप सांगळे ,देशमुख जळगावचे संदीप बोरसे व्हिजन कलाशिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्री सांगळे व इतर साहेबराव कुटे, दशरथ जारस, शिरसाट sb, विधाते हरक भागवत उपस्थित होते.
