
जातेगाव:( प्रतिनिधी )आगामी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जनता विद्यालय जातेगाव येथे विद्यार्थ्यांनी ‘कॉपीमुक्त परीक्षा’ देण्याचा निर्धार केला. शाळेचे प्राचार्य श्री. धुळे पी. के. यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमात श्री. मराठे एस. एम. यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे परीक्षा देण्याची सामूहिक शपथ दिली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता स्वकष्टाने यश मिळवावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सामूहिक शपथ घेतली.
