
नाशिक (प्रतिनिधी ) दिनांक २१ जानेवारी : नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनच्या वतीने आणि व्ही. डी. के. स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार आणि सोमवार दिनांक २५ आणि २६ जानेवारी, २०२६ रोजी नाशिक येथे विविध गटासाठी जिल्हा ऍथलेटिकस ऍथलेटिकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ता स्पर्धा नाशिकच्या हिरवाडी, पंचवटी, येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये ६ वर्षे, ८ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे १४ वर्षे आणि १६ वर्षे मुले आणि मुली या सहा गटांचा समावेश आहे. या स्पर्धा भारतीय ऍथलेटिकस असोसिएशनच्या तांत्रिक नियमावलीनुसार आयोजित केल्या जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या वयाच्या माहितीसाठी महानगरपालिका, नगरपालिका, ग्राम पंचायत यांचेकडून आपल्या जन्माचा दाखला आणणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या विविध गटातील खेळाडूंची जिल्हा संघामध्ये निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस स्पर्धा आणि निवड चाचणीमध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील.
या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी वैजयंत काळे मो. क्र. ८३७८८३५९९९, संदीप फुगट मो. क्र. ९६८९३४२९७४, बालाजी शिरफ़ुले मो. क्र. ९८८१४१६५१९, ज्योती काळे मो. क्र. ७३८५१७७१२६, निकिता दरेकर मो. क्र. ९१५८२७६९११ यांच्याशी संपर्क करावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा.

या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवहान नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगीरी यांनी केले आहे.
