
नाशिक ( प्रतिनिधी ) विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या मंचाच्या मासिक शाखेच्या वतीने गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी १०.०० ते सायं.५ .०० यावेळी नाशिक जिल्ह्यात स्तरीय समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात करण्यात आले आहे. या समरसता संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि कवी ह भ प श्री शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनात राज्यभरातील 51 कवींना काव्य सादरीकरणासाठी खास निमंत्रित करण्यात आले असून त्यांचा राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या संमेलनात उपस्थित लेखकांचा खुला परीसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाचा विषय – मराठी साहित्याने मला काय दिले? असा आहे. या संमेलनाच्या समारोप सत्रात “कवी मनाची आरोळी” , विश्वात्मक चारोळी,अशी उस्फुर्त चारोळी सादरीकरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेनंतर दुपारी एक ते तीन या वेळेत जिल्हास्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातील सहभाग सर्व वयोगटातील कवी लेखकांसाठी विनामूल्य असून सहभाग नाव नोंदणीसाठी उपक्रम समन्वयक श्री अनिकेत सुपेकर व्हाट्सअप क्रमांक- 7400415910 यावर संपर्क करावा. जेष्ठ कवयत्री सौ. हेमलता गीते यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाची संयोजन समिती कार्य करत असल्याचे संयोजक श्री. शिवराज पाटील यांनी कळविले आहे.
