
. आसरखेडे ( प्रतिनिधी ) दि. २१/ जनता विद्यालय आसरखेडे येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कापडनीस सी.आर.होत्या.त्याऔनी मराठी भाषेचे महत्त्व व संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले.या प्रसंगी महाराष्ट्रातील लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोककला, उपक्रमांचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यात महाराष्ट्रातील सकाळ, सन उत्सव कसे साजरे करावे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
