
लासलगाव, ता. २१ (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २१ जानेवारी रोजी विद्यार्थिनी मंच चे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी डॉ.भाग्यश्री सोनवणे यांचे ‘महिलांचे आरोग्य व आहार’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या आहारामध्ये व खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केले पाहिजे व सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच मासिक पाळीच्या तक्रारी, विद्यार्थिनींच्या हार्मोन्स मधील बदल, डोळ्याची निगा, मायग्रेनचा त्रास अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत आलेल्या सौ.अनिता जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे होते त्यांनी विद्यार्थिनींना आरोग्य व समस्या या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.गायत्री गांगुर्डे यांनी केले तर प्रा.उषा आहिरे यांनी प्रास्ताविक केले तर आभार कु.वैष्णवी काळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.प्रांजली ढेरे व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.उषा आहीरे यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
