
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ पाटिल गायकर यांजकडुन-
सध्या शिक्षकाच्यां माथी शालाबाहय कामे सातत्याने लादली जात असुन आता पशुगणनेची कामे शिक्षकावर लादली गेली आहेत.त्यामुळे शिक्षक शाळेत विदयार्थ्यानां शिकवतानां कमी व गल्ली बोळातच भटकतानां जास्त आढळत आहे. विचारले तर एकच उत्तर मिळते , सध्या भटक्या पशुचीं गणना सुरु आहे.
शिक्षकाने अध्यापनाचे कार्य करावे.भावी पिढी उत्तमोत्तम घडवावे ही अपेक्षा असते.मात्र अलिकडे अध्यापनाचे काम सोडुन सर्व कामे शिक्षकाकडुन करवली जात असल्याने प्राथमीक व माध्यमिक शिक्षणासह सार्वत्रिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे.
ही गंभीर वस्तुस्थिती असतांनाही शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे प्रयत्न करण्याऐवजी शासन शिक्षकावर आधिकाधिक शालाबाहय कामे लादत आहे, हे अत्यंत चुकिचे व विदयार्थी हितास बाधा आणणारे गंभीर कृत्य असतानांही ना शासनास याची चाड आहे, ना समाजास, ना पालकास व ना भारंभार असणार्या शिक्षक संघटनास.
खरेतर समाजहिताचे दृष्टिने लोकसंख्या गणना, जातनिहाय गणना, दारिद्यरेषा गणना या महत्त्वाच्या बाबी असतानां त्याकडे दुर्लक्ष करत शासन ही पशुगणना करत असुन यासाठी शिक्षकानां कामाला जुंपले आहे. शिक्षक लागोपाठच्या निवडणुक कामानींही त्रस्त असुन गेले वर्षभर सातत्याने या ना त्या बाबीचीं कामे सुरु असुन, या कामास शिक्षकानां जुंपले गेलेले आहे.याचा गंभीर परिणाम विदयार्थी वर्गावर होत असुन, त्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे ही वस्तुस्थिती असतांनाही याचे गांभिर्य कुणास नसावे ही चिंतेची बाब आहे.
दरम्यान शिक्षक बिचारा गल्ली बोळात भटकत पशुचीं गणना करत आहे. तर मोकाट विदयार्थी वर्गात आनंदी आनंद साजरा करत मोकाट भटकत आहे. एकुणचं शिक्षणाचं मात्र चांगभलं सुरु आहे.
