
वसंत गोसावी सिन्नर प्रतिनिधी:
सिन्नर येथील ब. ना. सारडा विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक सिन्नर तालुका स्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.


या स्पर्धेत वैयक्तिक नृत्य (मोठा गट) या प्रकारात कोमल देविदास कराड हिने प्रथम क्रमांक पटकावत उत्कृष्ट यश संपादन केले. तसेच मॅथ बी (पाचवी–सहावी गट) या स्पर्धेत वेद शंकर खैरनार हा विद्यार्थी सिन्नर तालुक्यातून अव्वल ठरला. शाळेतील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर विविध स्पर्धांत सहभाग नोंदवला असून त्यापैकी दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
वक्तृत्व स्पर्धेत श्रुती नवनाथ आंधळे, 200 मीटर धावणे (मुले) या स्पर्धेत वंश दीपक गोफणे यांनी चांगली कामगिरी केली. स्पेलिंग बी स्पर्धेत सुप्रिया सजन सांगळे (चौथी), वेद शंकर खैरनार (पाचवी), स्वरांगी नवनाथ आंधळे (सहावी) व प्रिया राजेंद्र खताळे (सातवी) यांनी सहभाग घेतला. मॅथ बी स्पर्धेत वेद शंकर खैरनार (पाचवी – सहावी गट) व प्रिया ज्ञानेश्वर खताळे (सातवी–आठवी गट) यांनी आपली बुद्धिमत्ता दाखवली. याशिवाय वेद शंकर खैरनार याने वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत सहभाग घेतला, तर मोठा गट समूहगीत गायन या स्पर्धेत शाळेच्या संघाने प्रभावी सादरीकरण केले.
या सर्व यशामागे मुख्याध्यापक वसंत गोसावी तसेच मार्गदर्शक शिक्षक सुनिता बर्वे, कैलास पवार, मीना सोनवणे, स्वाती खताळे, सुनिता खताळे व प्रतिभा पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत पाटोळे व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
