
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिवर्षी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. या स्पर्धा परीक्षेत यंदाही विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, परीक्षेत युवराज रवींद्र सरोदे प्रथम, राजश्री विठ्ठल हुलगुंडे द्वितीय, तर अंजली भास्कर काळे तृतीय क्रमांक पटकाविला.
सर्व विद्यार्थ्यांना एम के. पोलगीर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई रोडूआण्णा पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, पर्यवेक्षक व्ही डी. काळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
