
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६३ वा दिवस जगामधील सर्व जीवांना आपल्या कर्मफलाच्या उपभोग घेण्यास्तव यावे लागेल जर असे एखादे ठिकाण असेल की भगवत्-लाभाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला अंती जिथे येऊन दाखल व्हावेच लागेल जर असे एखादे स्थान असेल की जिथे माणसात कोमलता, शुचिता, दया, दाक्षिण्य, क्षमा, प्रभृती, सद्गुणांचा इतर कुठल्याही पेक्षा अधिक विकास झाला आहे. जर अशी कोणती एखादी भूमी असेल ती जिला अंतर्दृष्टीचे आणि आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच होय.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ११ चैत्र शके १९४७*★ चैत्र शुद्ध /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १ एप्रिल २०२५
★ १८८७ मुंबई अग्निशमन दलाची स्थापना.
★ १८९५ भारतीय लष्कर स्थापन झाले.
★ १८८९ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिन
★ १९३५ भारतीय रिझर्व बँकेची स्थापना
★ १९४२ नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय रोडूआण्णा पाटील यांची ८३ वी जयंती.


