
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव व मनमाड बस आगारात प्रत्येकी पाच नवीन बसेस नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे कृतीशील आमदार सुहास आण्णा कांदे या़ंच्या प्रयत्नामुळे पहिल्या टप्प्यात दोन्ही आगाराला पाच – पाच नवीन बसेस मिळाल्यामुळे बस आगारात आनंदाचे वातावरण बस कर्मचाऱ्यांमध्ये पाहावयास मिळाले. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते नवीन बसेसचे पुजन करण्यात आले. आता लांबपल्याच्या गाड्यात प्रवास करतांना प्रवाशांना आरामदायी व सुखकारक प्रवास करण्यास मिळणार आहे. आमदार सुहास कांदे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन नांदगाव व मनमाड बस आगारातील बसेस अत्यंत जुन्या झालेल्या असुन त्या वारंवार नादुरुस्त होतात. अनेक वेळा रस्त्यावर बंद पडत असून अपघात देखील होत आहेत. त्यामुळे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असुन खाजगी वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत असल्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे जुन्या बसेसमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्याकरिता नांदगाव व मनमाड आगार येथे नवीन बसेस उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशी मागणी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केली होती .याप्रसंगी राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, प्रमोद भाबड ,सागर हिरे ,सुनील जाधव, प्रकाश शिंदे कार्यशाळा अधीक्षक ईश्वर सानप वाहतूक निरीक्षक मयूर सूर्यवंशी ,विनोद इप्पर, विलास गीते ,सुनील कासार, डी. पी. जगधने ,किरण शिनगारे, अभिजीत शेरेकर, अण्णा इप्पर, अरुण सांगळे आदी उपस्थित होते.
