
नाशिक ( प्रतिनिधी) आपली संस्कृती आणि परंपरा यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या गीता परिवार नाशिक व रुद्रेश्वर महादेव मंदिर गोविंद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंद नगर येथे गुढीपाडव्यानिमित्त शंखनाद,लेझीम लाठीकाठी, व ढोलतशाच्या गजरात भव्य शोभायात्रा संपन्न झाली.रामायणातील पात्रांचे देखावे, गोविंद नगर च्या महिलांनी लेझीम शिकून केलेल्या विविध रचनांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे डोळे दिपले. लाठीकाठीमध्ये पण उत्तम प्रशिक्षित महिला व मुलांनी विविध कसरतीचे सादरीकरण केले. अनेकता मे एकता अंतर्गत अनेक जोडप्यांनी भारतातील विविध प्रांतातील वेशभूषा करून केलेले सादरीकरण या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. या भव्य शोभायात्रेमध्ये सर्व गोविंद नगरवासीयांनी उत्साहात सहभागी होऊन या अभूतपूर्व उपक्रमाचा आनंद लुटला.

गणपती मंदिर गोविंद नगर येथून शोभा यात्रेला सुरुवात होऊन शांती उद्यान गोविंद नगर येथे माननीय आमदार सौ. सीमाताई हिरे व माजी नगरसेविका सौ अश्विनीताई बोरस्ते यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम झाला. डॉक्टर प्रफुल्ल चांडक सर, माननीय विणा दीदी (ब्रह्मकुमारी) , श्री बधान सर व श्री राजेंद्र नलावडे हे सुद्धा विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते.श्री रवींद्र वाणी व श्री रविंद्र सोनजे व सुंदर गोविंद मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.आपली संस्कृती व परंपरा जपणाऱ्या या शोभायात्रेने सर्व गोविंद नगरवासीय भारावून गेले होते.कु. स्पर्शिका मालपूरे ने तिच्याशी दमदार आवाजात शिवगर्जना देऊन वातावरण शिवमय केले लेझीम प्रशिक्षिका सौ नेहा अमृतकर व लाठीकाठी प्रशिक्षक श्री राहुल खानापुरे यांनी बाळ गोपालांसह गृहिणींना प्रशिक्षण दिले या शोभयात्रेत गोविंद नगर मधील त्रिवेणी महिला मंडळ, भारतीय योग संस्था, जिजाऊ हास्य क्लब सहभागी झाले होते समारोपाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंद लाहोटी यांनी केले. सौ अश्विनी नलावडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. समारोपाच्या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रसाद रुपी अल्पोपहारचे नियोजन केले होते. या शोभा यात्रेच्या आयोजनासाठी श्री अजय सोनजे यांनी आर्थिक सहकार्य केले तसेच नाशिक गीता परिवार अध्यक्षा सौ. शैलजा ब्राह्मणकर ,सौ. अश्विनी नलावडे, सौ विद्या लाहोटी, श्रीमती विजया शेवाळे, सौ.सुनीता बधान,अमित वझरे, श्री प्रदीप ब्राह्मणकर व सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
