
नांदगाव ( प्रतिनिधी) गिरण्या नगर ग्रामपंचायत सदस्य सागर भाऊ आहेर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राज्य पुरस्कारार्थी मा. विष्णू निकम सर, नांदगावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतिश बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जीवन गरुड, मा.बाळासाहेब कवडे, भाऊसाहेब दादा काकळीज,विजय पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आ.सुहास आण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे त्यांनी निश्चय केला.
