
विंचूर ( प्रतिनिधी )विंचूर येथील लोनगंगा नदी किनारी असलेले दशक्रिया विधी शेड व परिसराचे विंचूरचे युवा नेतृत्व व माननीय सरपंच श्री सचिन दादा दरेकर यांच्या संकल्पनेतून “ग्रामनिधी अंतर्गत”शुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वॉल कंपाऊंड वर विविध संतांचे अभंगातील ओव्या यांची भिंती चित्रे, सुमारे 12000 लिटर क्षमतेचा जलकुंभ, केस कापण्यासाठी नाभिक बांधवांना व येणाऱ्या नातेवाईकांना बसण्यासाठी ओटा बांधकाम तसेच दशक्रिया विधी करण्यासाठी पुरोहित व नातेवाईक यांना बसण्यासाठी ओटा तसेच परिसरात विविध प्रकारची फुल झाडे लावण्यात आलेली आहेत.. त्याबाबत विंचूर कराकडून माननीय सरपंच साहेबांचे तसेच विंचूर ग्रामपंचायतीचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे…

