
सिन्नर (प्रतिनिधी ) ११ जानेवारी २०२६ दिवंगत माजी आमदार सूर्यभान गडाख ( नाना) यांची ९६ व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार चा वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास व दिवंगत मा.आ.सूर्यभान गडाख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
सिन्नर तालुक्यातील औद्योगिक क्रांतीचे जनक, देवपूरचे भूमिपूत्र माजी आमदार सूर्यभान सुकदेव गडाख औद्योगीकरणाशिवाय तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून माजी आमदार गडाख यांनी आशिया खंडातील पहिली सहकारी औद्योगिक वसाहत उभी केली. तालुका बोर्ड सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्यपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. याशिवाय त्यांनी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली. शेती, कडवा प्रकल्प, मीटर मीटर हाटाव आंदोलन, दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी, दळणवळण साधनांचा विकास अशा अनेक कामांतून गडाख यांनी राज्यभर आपली ओळख निर्माण केली. अशा माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार मनोज माळी यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे विजय मुठे प्रकाश माळी मनोज माळी शरद शिरसाठ संजय क्षत्रिय दत्तु लोंढे राजेंद्र दिवे सुभाष परदेशी राजेंद्र सातभाई धनंजय परदेशी गणपत काळे राजेंद्र देशमुख
