
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१४८ वा दिवस
*'उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत'*
उठा ! जागे व्हा !! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका !!! उठा धीट बना, सर्वशक्तिसंपन्न बना तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणिव असू द्या की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात, देशाला लोखंडी स्नायूंची, पोलादी मज्जतंतूची, वज्राचे मन असलेल्या पुरुषार्थ, क्षात्र, तेज, वीर्य, ब्रम्हसंपन्न तरुणांची खरी गरज आहे. ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करुणा असलेले सहस्रों युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील, मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्वप्रकारच्या समानतेचे आवाहन करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल!
स्वामी विवेकानंद…
ज्यांच्या जाज्वल्य विचारांनी माझ्या जीवनाला नवकलाटणी मिळाली, ज्यांच्या कृपादृष्टीने भोग आणि मोक्ष दोन्ही लाभत असतात, जे पापसमूहाचा नाश करण्यात निष्णात आहेत, जे मस्तकी चंद्रकोर धारण करणारे शिवच आहेत व जे ‘इंदू’ चे वंदनीय आहेत, त्या गुरुवर विवेकानंदांना जन्मदिनी माझे शत् शत् नमन.
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २२ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १२ जानेवारी २०२६
★ १५९८ राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मदिन
★ १७०५ मराठा साम्राज्याची राजधानी सातारा.
★ १८६३ भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभरात प्रचार, प्रसार करणारे तत्त्वज्ञ, योद्धा सन्यांशी स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन’
★ स्वामीजी आपण प्रज्वलीत केलेली विश्व अभ्युदयाची मशाल आज आमच्या हातात आहे. या कार्याचे पायिक म्हणून तुम्ही आमची निवड केली म्हणून आम्ही कृतज्ञ आहोत आणि कृतार्थही. वीर संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र स्मृतिस शतशः नमन.
★ राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
