
सिन्नर ( प्रतिनिधी)१२ जानेवारी २०२६ राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार , आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जनता आदिलशाही निजामशाही कुतुबशाही यांच्या कडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराने जनता त्रस्त होती.होणारा त्रास दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छञपती शिवाजी महाराजांनी (मराठा) आठरापगड जाती-जमातींना एकञ करून स्वराज्याची स्थापना केली.लोकांवर होणा-या जुल्मी अन्याय अत्याचारा विरोधात कसे लढावे व जातिय विषमता,अंधश्रध्दा नष्ट व्हावी,जनता गुण्यागोविंदाने एकञ नांदावी या साठी शिवाजी महाराजांना समतेची शिकवण जिजाऊंनी दिली.मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे सर्व जाती-जमाती धर्मातील लोक.आज जाती-धर्माच्या नावाखाली समाजा-समाजात तेढ निर्माण केली जात आहे.तरूणांनी जातीभेद न करता हातात दगड, दंडुके न घेता हातात लेखणी घेऊन चांगले शिक्षण घेतले पाहिजे व राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना दिलेली शिकवण आठवणीत ठेवून अन्याय अत्याचाराचा विरूद्ध आवाज उठवला पाहिजे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांचे आभार दत्ता जाधव यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक, राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,प्रकाश माळी सोमनाथ लोहारकर मनोज माळी दत्ता जाधव धनंजय परदेशी गणपत काळे राजेंद्र देशमुख राजेंद्र सातपुते संजय पोटे सुभाष परदेशी आदि उपस्थीत होते.
