
नांदगाव (प्रतिनिधी) मविप्र समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव व सावित्रीबाई फुले पुणेवाखारी येथे रासेयो. शिबीराद्वारे तिसऱ्या दिवशी पाणलोट व जल व्यवस्थापनाची कामे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वाखारी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर दिनांक ८/१/२०२६ ते १४/१/२०२६ पर्यंत होत आहे.

तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी.एम. आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी वाखारी गावास पाणी पूरवठा करणाऱ्या विहीरी जवळील गटाचा मार्ग बदलून परीसर स्वच्छ केला व गावाजवळून वाहनाऱ्या नदीपात्रातील काटेरी गवत, पानगवत प्लास्टिककचरा काढला. जुन्या मंदीराची स्वच्छता केली. दुसऱ्या बौद्धिक सत्रात महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख व विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ. सी. बी. निगळे यांनी पाणलोट आणि पडिक जमिन व्यवस्थापन विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी रा.से.योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. पवनसिंग बाबुसिंग परदेशी यांनी शिबीरास भेट दिली व स्वयंसेवकांना जल व्यवस्थापन व पाणलोट विषयावर मार्गदर्शन केले. व स्वयसेवकांनी या दिवशी संबंधित विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक केल्याने स्वंयसेवकांना दुग्ध शर्करा योग साध्य करता आला.

तसेच या दिवशी विशेष मार्गदर्शन छत्रपती कलरी गुरूकुलम संस्थेचे प्रमुख आकाश रोहम व त्यांचे सहकारी धनंजय स्वर यांनी आत्म संरक्षण या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखविले. याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस.एस. प्रसाद, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.आर.झनकर, डॉ. पी.टी. निकम, पदार्थ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एस. शेंडगे, प्रा.श्रीमती पी.एच. कडलक, रा.से.यो. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.डी. ठाकरे, प्रा.श्रीमती पी.डी. पाटील, श्री विलास आहेर, श्री गोरख काकळीज व स्वयंसेवक उपस्थित होते.
