
सरताळे(साकोरा)ता. नांदगाव येथे आज संस्था सरचिटणीस रमेश अप्पासाहेब पगार व संस्था कोषाध्यक्षा तथा आश्रम शाळा मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता शेवाळे मॅडम व प्राचार्य समाधान चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीपाद टाकळकर साहेब छत्रपती संभाजी नगर यांनी आपल्या उदबोधन वर्गात आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना आजच्या विज्ञान, तंत्रज्ञाना च्या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान करीत मोबाईल सारख्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा सकारात्मक उपयोगाचे फायदे नमुद केलेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण आणि क्रियाशील विद्यार्थिच स्वतःच भविष्य घडवु शकतो असे सांगत अंगीभूत क्रिया कौशल्याचा सर्वोतम विकास करणाचे आव्हान केले तर संस्था सरचिटणीस अप्पासाहेब पगार यांनी विद्यार्थी हा जिज्ञासु असावा आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि प्रयत्नचं त्यास अंतिम ध्येय्य पुर्तीस मदत करतात असे प्रतिपादन केले.सदर कर्यक्रम प्रास्ताविक प्राचार्य समाधान चौधरी सर यांनी मांडले तर सूत्रसंचालन अशोक पाटील सर यांनी सांभाळेल. आभार प्रदर्शनाने कार्यक्रम सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, अधीक्षक, अधिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेत.
