
वेहळगाव ( प्रतिनिधी) नांदगाव तालुक्यातील वेहेगाव येथील शेतातील घराला आग लागल्याने आठ शेळ्या जळून खाक झाल्या
तर काही शेळ्या गंभीर झाल्याचे दुर्दैवी घटना घडली. घराचे सामानसह घरातील रोख रक्कम व घराचे छप्पर पूर्ण उध्वस्त झाले. दि. 8 जानेवारी 2026 गुरुवार रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास ही घटना घडली. बेबाबाई फुलचंद सोनवणे या दुपारी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता तिच्या घराला आग लागली पूर्ण उध्वस्त होऊन जळून खाक झाले घरातील महत्त्वाचे वस्तू टीव्ही, बाज, कपडे, धान्याचे,पोते पूर्ण सामान रोख रक्कमेसह सगळे जळून भस्मसाथ झाले.

घराच्या पाठीमागून चाळ बनवलेली होती जाणवरांसाठी शेळ्या, मेंढ्या बांधलेले होते त्यामध्ये त्यांच्या मालकीच्या पाच शेळ्या गंभीर भाजल्या असून आठ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तलाठी मॅडम वि.भा. देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यात त्यांच्या मालकीच्या पाच शेळ्या गंभीर भाजलेल्या असून आठ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी पंचनामा मध्ये नोंद आहे. घटनेची माहिती मिळतात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन.टी. ताठे पशुधन विकास अधिकारी यांच्या टीमचे डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. अजय जोहरे, बाळकृष्ण सुरवसे, अजय आहेर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमी शेळ्यावर उपचार केले. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वेबाबाई सोनवणे या वेहेळगाव आदिवासी महिला मोल- मजुरी करून उदरनिर्वाह करून घर चालवत आहे पण घर जळुन खाक झाले. त्यामुळे घरातकाहीच राहिले नाही. पूर्ण घराचे छप्पर उध्वस्त झाले. अंदाजे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे असे बेबाबाई सोनवणे यांनी घडलेली घटनेबद्दल बोलत असताना सांगितले यावेळी त्यांचे अश्रू आणावर झाले. माझे चार वर्षाचे दोन नातू त्या ठिकाणी खेळत होते. मला माहिती मिळताच मी ओरडत माझ्या घराजवळ पळत सुटले सुदैवाने मोठी घटना टळली माझे नातू घरापासून लांब पळाले माझी शासनाकडे विनंती आहे. माझ्या शेळ्या मृत्युमुखी झाल्या तर काही गंभीर जखमी झाल्या आहे. मला नुकसान भरपाई मिळावी व आमचे आमदार साहेब नेहमी मदत करतात त्यांनी पण मला मदत करावी अशी मागणी बेबाबाई सोनवणे यांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे केली.
