
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयाने पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने आयोजित सप्ताहात अंतर्गत विविध उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन केले. गावातून स्त्री शिक्षणाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी ‘लेक वाचवा लेक शिकवा’ या विषयावर जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. या निमित्ताने गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, विद्यालयातील पर्यवेक्षक व्ही. डी. काळे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

